रत्नागिरी : धान्य दुकान मंजुरीच्या अर्जास मुदतवाढ

रत्नागिरी : रास्तभाव धान्य दुकान परवाना मंजूर करण्यासाठी शासनाने मुदतवाढ जाहीर केली आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. यापूर्वी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑगस्टपर्यंत होती. त्यात ८, ९, १० ऑगस्टला शासकीय सुट्टया असल्यामुळे तसेच जाहीरनामा प्रसिद्धीनंतर प्रतिसाद न मिळाल्याने ही मुदत १४ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत सर्व तहसीलदारांना कळवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 09/Aug/2025