भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानात खेळवण्यात येत आहे. रचिन रविंद्र याच्या दमदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ४०२ धावा केल्या केल्या.
भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला होता. त्यानंतर ४०० पारचा आकडा गाठत न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात तब्बल ३५६ धावांची आघाडी घेत टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज निर्माण केले आहे.
तिसऱ्या दिवसाच्या खेळात रचिन रविंद्र याने आपलं शतक साजरं केले. कुलदीप यादवनं त्याची विकेट घेत न्यूझीलंडचा पहिला डाव आटोपला. त्याआधी रचिन रविंद्र यानं १५७ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीनं १३४ धावा केल्या. त्याच्याशिवाय तिसऱ्या दिवशी साउदीचा जलवा पाहायला मिळाला. टिम साउदीनं ७३ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी साकारली.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियानं चार विकेट झटपट मिळवल्या, पण..
रचिन रविंद्र (Rachin Ravindra) ३४ (२२) आणि डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) १४ (३९) या जोडीनं तिसऱ्या दिवशी ३ बाद १८० धावांवरुन न्यूझीलंडचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. मोहम्मद सिराज याने डॅरिल मिचेल १८ (४९) च्या रुपात न्यूझीलंडच्या संघाला चौथा धक्का दिला. बुमराहन टॉम ब्लंडेल ५(८) याला माघारी धाडले. एवढेच नाही तर जड्डूनं ग्लेन फिलिप्स १४ (१८) आणि मॅट हेन्री ८(९) यांना स्वस्तात चालते केले. न्यूझीलंडची अवस्था ७ बाद २३३ धावा असताना रचिन आणि साउदी जोडी जमली.
जड्डूसह कुलदीपच्या खात्यात ३ विकेट्स
या दोघांनी आठव्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी रचली. ही जोडी फोडण्याचं मोठं चॅलेंज निर्माण झालं होते. न्यूझीलंडच्या धावफलकावर ३७० धावा लागल्या असताना मोहम्मद सिराजला अखेर यश मिळालं. त्याने साउदीची विकेट घेतली. त्यानंतर कुलदीनं एजाज पटेल आणि रचिनला बाद करत न्यूझीलंडचा पहिला डाव आटोपला. भारताकडून कुलदीप यादव आणि जड्डूनं प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराज याच्या खात्यात २ विकेट जमा झाल्या. बुमराह आणि अश्विनच्या खात्यातही एक-एक विकेट जमा झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 18-10-2024