लांजा : आमदार किरण सामंत यांचा सोमवारी जनता दरबार

लांजा : लांजा शहरातील आणि विशेषता नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आमदार किरण सामंत यांचा जनता दरबार सोमवार दिनांक ११ ऑगस्ट दुपारी ३ वाजता आग्रे हॉल, लांजा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

लांजा शहर समन्वयक समितीच्या मागणीवरून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यांचा शहर परिसरातील नागरिकांना त्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींवर चर्चा करून त्याचे निवारण या जनता दरबारात केले जाणार आहे.

तरी या जनता दरबाराला लांजा शहर परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 09-08-2025