चिपळूण : सावर्डेत मुंबई-गोवा महामार्गावर उनाड जनावरांचा त्रास

चिपळूण : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावर उनाड जनावरांनी ठाण मांडले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर सकाळी व सायंकाळच्या वेळी मोकाट जनावरे बसलेली पाहायला मिळतात. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसी, परशुराम, वालोपे, चिपळूण शहर, सावर्डे आदी भागांमध्ये या उनाड जनावरांचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी देखील ही जनावरे रस्त्यात बसलेली दिसून येतात. यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत. विशेषकरून लोटे एमआयडीसी भागात उनाड जनावरांची मोठी समस्या आहे. त्यामुळे अपघात होऊन काहींचा बळीदेखील गेला आहे तर अनेकजण जायबंदी देखील झाले आहेत.

चिपळूण शहर परिसरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर देखील अनेकवेळा राजरोसपणे भटकी जनावरे तसेच म्हशींचा ताफा जाताना पाहायला मिळतो. आठ ते दहा म्हशी तसेच मोकाट जनावरे तर कधी मोकाट कुत्रे यामुळे महामार्ग अडविला जातो तर कधी अचानक जनावरे रस्त्यात आल्याने अपघातदेखील होत आहेत. याची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 18/Oct/2024