चिपळूण : रत्नागिरी येथे सोमवारी (ता. ११) जिल्हा उद्योग विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे ही परिषद घेण्यात आली आहे. यामध्ये माजी केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाचा उद्योजकांशी संवाद, जिल्हा उद्योजकता पुरस्काराचे वितरण उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सत्कार आणि मंत्री सामंत यांची मुलाखत होणार आहे. श्रद्धा साफल्य मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिषदेत उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरणही होणार आहे, अशी माहिती राजू सावंत यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 11-08-2025














