Ratnagiri : ‘उबाठा’चे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

रत्नागिरी : महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांनी महाराष्ट्र देशभरात बदनाम होत असल्यामुळे राज्यातील जनतेला या सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत जागरुक करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता रत्नागिरी जिल्यासह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे हे मुंबई दादर शिवाजी पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ या आंदोलनात सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्हाधिकारी शहरातील शहराध्यक्षासह कार्यालयासमोर विविध प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

राज्यभर करणाऱ्या आंदोलनात समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा ६० कोटींचा घोटाळा आणि १५०० कोटींचा गैरव्यवहार, कृषीमंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचे रमीचे डाव आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबद्दल बोलताना ढेकळांचे पंचनामे करायचे का, असे वाह्यात विचारलेले प्रश्न, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावे असलेला डान्सबार, राज्य सरकारमधील मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनीट्रॅप प्रकरण अशा अनेक विषयांचा जाहीर पंचनामा करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 11-08-2025