इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा

नवी दिल्ली : कथित मतचोरीच्या विषयाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी सोमवारी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणार आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील. इंडिया आघाडीचे सर्व खासदार या मोर्चामध्ये सहभागी होणार असून, राहुल गांधी मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचे कळते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राहुल गांधी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 11-08-2025