रत्नागिरी : शिळ धरणात पावसाळ्यात पंपिंग स्टेशन जवळ आलेला गाळ काढण्याच्या कामासाठी सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होणार नसल्याचे रत्नागिरी नगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.
शिळ धरणातून ज्या ठिकाणी पाणी वर उचलले जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने सध्या धरणातून पाणी उचलण्याची क्षमता कमी झाल्याचे दिसून येत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आता पंपिंग स्टेशन येथील जेटीच्या जवळील गाळ काढण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे सर्व शहर वासियांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करून नगरपालिकेला सहकार्य करावे अशी विनंती नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 21-09-2024