केंद्रीय जल आयोग अधिकाऱ्यांची राजापुरातील अर्जुना पाटबंधारे प्रकल्पाला भेट

पाचल : राजापुरातील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला केंद्रीय जल आयोग पुणे, चे डायरेक्टर सत्येंद्र सिंग व डेप्युटी डायरेक्टर धर्मेंद्र सिंग यांनी ६ व ७ ऑगस्ट रोजी पहाणी दौरा केला. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी नाविलकर, आंबोळी सरपंच गायत्री साळवी आदी उपस्थित होते.

या दौऱ्यात जल आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत तळवडे व रामेश्वर नवलाई पाणी वापर संस्थाच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या झालेल्या कामाबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पाणी वापर संस्था अधिक सक्षम करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी करत डिसेंबर अखेर शेतकऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी केली. यावेळी शिवकुमार लिंगायत, सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, चित्तरंजन लिंगायत, बाळकृष्ण पराडकर, आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 11/Aug/2025