गुहागर : सध्याच्या आधुनिकतेच्या युगात पोस्ट कार्यालयही एक पाऊल पुढे असून, टपाल खात्यातही अग्रणीय बदल झाला आहे. टपाल खात्याला ग्राहक वर्गाचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन अभिषेक पोळेकर यांनी केले.
टपाल दिनानिमित्त गुहागर पोस्टात श्री देव गोपाळ कृष्ण विद्यामंदिर गुहागरच्या विद्यार्थ्यांनी गुहागर पोस्ट कार्यालयात भेट दिली. यावेळी पोळेकर बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना टपाल खात्याची माहिती दिली. गुहागर पोस्ट कार्यालयात टपाल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड, अंतर्देशी कार्ड, पोस्ट पाकीट, रेव्हुनी स्टॅम्प, पोस्टाची विविध तिकिटे, साधे टपाल, स्पीड पोस्ट, मनीऑर्डर, टपाल ट्रेकिंग यांची माहिती देऊन त्यांचे कार्य कसे चालते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
तसेच आयपीबीपी, पोस्ट सेव्हिग खाते, टीडी, किसान विकास पत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, मासिक प्राप्ती योजना, वरिष्ठ पेन्शन योजना, जीवन सुकन्या, पोस्टल इन्शुरन्स विविध योजनांची माहिती पोस्ट कार्यालयात विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी गुहागर पोस्ट मास्तर एस. के. दहीवलकर, प्रसाद दिवाडकर, दीक्षा मोरे, तुषार आरेकर, सुभाष केसरकर, पूर्वा रायकर, अनुष्का चव्हाण उपस्थित होते. मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, शिक्षिका सावंत, गुहागर पोस्ट मास्तर दहिवलकर यांनी डाक दिनानिमित्त अविरतपणे काम करणाऱ्या गुहागर कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या नऊ शाखा डाक घरातील सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व त्यांचा भेटवस्तू देऊन गौरव केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 18/Oct/2024











