चिपळूण : आंबडस विद्यालयात विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

चिपळूण : सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, आंबडस विद्यालयात नारळीपौर्णिमा आणि रक्षाबांधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्ष हे खऱ्या अर्थाने आपले संरक्षण करतात. निसर्गाचा समतोल राखण्यात झाडे महत्वाची भूमिका बजावतात. अलीकडच्या काळात वाढत चाललेली वृक्षतोड आणि त्यामुळे होणारा निसर्गाचा हास हे मुद्दे डोळयांसमोर ठेवत वृक्ष लागवड आणि संवर्धन याबाबत विद्यार्थी व समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने विद्यालयातील हरित सेना व विज्ञान छंद मंडळ या उपक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश दिला.

यासाठी विद्यालयातील इयत्ता ११वी सायन्सचे विद्यार्थी व वर्गशिक्षिका प्रज्ञा जठार यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक महेश कुलकर्णी, राजेंद्र बांबाडे, मधुसूदन मार्गज, गणेश सावर्डेकर, कृष्णकांत कुंभार, भास्कर महाडिक व रुपेश धाडवे, संतोष शिंदे, सिद्धेश पाटील तसेच शिक्षिका राजनीगंधा पवार, संगीता चौघुले, प्रज्ञा जठार , उषा आवळे, साक्षी दळवी तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 11/Aug/2025