राजापूर : गणेशोत्सव काळात तालुक्यात येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी नियमित गाडयांबरोबरच प्रवाशांच्या मागणी प्रमाणे मुंबई, बोरिवली, ठाणे, नालासोपारा या मार्गावर जादा गाडयाही सोडण्यात येणार आहेत. याबाबतचे नियोजन आगार प्रशासनाच्या वतीने आत्तापासूनच हाती घेण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख अजित घोसार्डे यांनी दिली आहे. तर प्रवाशांनी ग्रुप आरक्षण करून गाडीची मागणी केल्यास तशीही गाडी देण्यात येणार असल्याचे घोसार्डे यांनी सांगितले.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी राजापूर तालुक्यात मोठया प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी दाखल होतात. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आत्तापासूनच आगाराच्या वतीने नियोजन हाती घेण्यात आले आहे. नियमित मुंबई व बोरिवली मार्गावरच्या गाड्या सुरू आहेतच. तर हंगामी काळात सुरू केल्या जाणाऱ्या गाड्याही आता सुरू करण्यात आल्या असून त्यांचे ऑनलाईन पध्दतीने आरक्षणही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तर आता परतीच्या प्रवासासाठी जादा गाडयांचेही नियोजन करण्यात येणार असून गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या जादा गाडयांचे आरक्षण महत्वपुर्ण ठरणार आहे. मुंबई, बोरिवली, ठाणे, नालासोपारा या मार्गावर जादा गाडयाही सोडण्यात येणार आहेत. या गाडयांचे आरक्षणही ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही मुंबई, बोरिवली, ठाणे, नालासोपारा या मार्गावर जादा गाड्याही सोडण्यात येणार आहेत आगार प्रमुखांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:07 PM 11/Aug/2025














