रत्नागिरी : बाल्कनीत चक्कर येऊन पडलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
हरिश्चंद्र गणपत सुर्वे (वय ६०, रा. राधेय संकुल, साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १०) सकाळी पावणेदहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुर्वे गेली पंधरा वर्षे आजारी होते. महिन्यापूर्वी त्यांच्या हृदयाला ब्लॉकेज असल्याचे त्यांच्यावर खासगी कोल्हापूर येथील हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. ते बाल्कनीमध्ये चालत असताना अचानक चक्कर येऊन फरशीवर पडले. उपचारासाठी त्यांना रत्नागिरीत खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 12-08-2025














