Breaking : तब्बल 15 हजार पोलिसांची भरती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 मोठे निर्णय!

Police Bharati Maharashtra Cabinet Decisions : महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज अखेर संपली आहे. आज मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( State Cabinet meeting ) तब्बल 15 हजार पोलीसपदांच्या भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पोलीस दलाला नवसंजीवनी मिळणार असून रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय मंत्रिमंडळाने आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेतले –

  • अन्न, नागरी पुरवठा विभाग – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
  • विमानचालन विभाग – सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय.
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.
  • गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 12-08-2025