लांजा : येथील महसूल प्रशासनातर्फे १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर शिपोशी येथील न्या. वै. वि. आठल्ये विद्यामंदिर येथे होणार आहे. मंडळस्तरावर भांबेड मंडळातील शिपोशी, बोरिवले, बाईगगाव, गोविळ, गुरववाडी, सालपे, कोचरी, केळवली, बौद्धवाडी तर्फ सालपे, डाफळेगाव, पालू, नामे, चिंचुर्टी, माचाळ, कोल्हेवाडी तसेच लांजा मंडळातील हसोळ, कुरचुंब या गावातील ग्रामस्थांसाठी हे शिबीर होणार आहे.
या शिबिरात ग्रामस्थ, विद्यार्थी व महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे भांबेडचे मंडळ अधिकारी महादेव चव्हाण यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 12/Aug/2025














