शुबमन गिलला ICC कडून मोठं गिफ्ट

Shubman Gill ICC Men’s Player of the Month for July 2025 :इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना शुबमन गिलनं विक्रमांची अक्षरश: बरसात केली.

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी झालेल्या कसोटी मालिकेत पिछाडीवर असताना गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ५ कसोटी सामन्यांची मालिकेत २-२ बरोबरी साधली. या मालिकेत शुबमन गिलच्या भात्यातून सर्वाधिक धावा निघाल्या. आता इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या भारतीय कॅप्टनला ICC कडून मोठ गिफ्ट मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेकडून जुलै महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या रुपात शुबमन गिलची निवड करण्यात आलीये.

गिलनं इग्लिश कॅप्टन बेन स्टोक्ससह या पठ्ठ्याला दिली धोपीपछाड

आयसीसीकडून दिल्या जाणाऱ्या जुलै महिन्यातील पुरस्कारासाठी शुबमन गिलसह इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर या तिघांमध्ये स्पर्धा होती. बेन स्टोक्सनं टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करताना एका शतकासह १७ विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे वियान मुल्डर याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला WTC चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. पण गिलनं या दोघांना धोबीपछाड देत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:00 12-08-2025