चिपळूण : आपत्ती व्यवस्थापनावर डीबीजे महाविद्यालयात प्रशिक्षण

चिपळूण : येथील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अर्थात एनडीआरएफ, पुणे ०५ बटालियनमार्फत टीम कमांडर जी. बी. प्रमोद रॉय यांच्या नेतृत्वाखाली ही प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. प्रशिक्षणात एनडीआरएफ पथकाच्या जवानांनी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी घ्यावयाच्या दक्षता, उपाययोजना तत्काळ प्रतिसाद व सुरक्षिततेच्या विविध पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 13/Aug/2025