आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५

मेष – आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण – घेवाण करू नका. शारीरिक व मानसिक बेचैनी राहील.

वृषभ – आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील.

उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान – सन्मान मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील.

मिथुन – आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान – सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल.

कर्क – आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह – आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. आज घरचे पदार्थ खाणे अधिक फायदेशीर होऊ शकेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील.

कन्या – आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे – पिणे टाळावे लागेल. खूप खर्च होईल. पाण्यापासून जपून राहावे लागेल. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे ह्यापासून शक्य तितके दूर राहावे.

तूळ – आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. बोलण्यावर ताबा ठेवा. खर्च वाढणार नाही याकडेही लक्ष द्या. कामात सफलता व यश प्राप्त होईल.

वृश्चिक – आज आपण वाद – विवादात अडकाल. शक्य असेल तर प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे यथोचित यश सुद्धा मिळेल.

धनु – आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगाल नाही.

मकर – आजचा दिवस मित्र – परिवारासह आनंदात जाईल. व्यवसाय करणार्‍यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आज आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता.

कुंभ – आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही.

मीन – आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. मित्र व कुटुंबीय यांच्यासह प्रवासास जाऊ शकाल. धनप्राप्ती संभवते. एखाद्या प्रवासात किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 13-08-2025