दापोली : हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कृषि क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांची १०० वी जयंतीच्या औचित्याने त्यांचा जन्मदिवस ०७ ऑगस्ट हा शाश्वत शेती दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहामध्ये विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली शाश्वत शेती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. संजय भावे यांनी आजच्या तरुण विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांनी स्वामीनाथन यांचा आदर्श घेतल्यास शाश्वत शेतीमधून समृध्दी साधणे सहज शक्य ही साधणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, देशात ७० ते ८० च्या दशकापूर्वी लोकसंख्येची भूक भागविण्याकरीता अन्नधान्य आयात करावे लागत होते. कृषि क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करुन त्यातून अभूतपूर्व क्रांती घडवून आज जगाला अन्नधान्य पुरविणारा देश अशी ओळख करून देणारा बहुआयामी दूरदृष्टी असलेल डॉ. स्वामीनाथन यांनी शाश्वत शेतीकडे नेणारे पथदर्शक कार्य करून ठेवले आहे असेही ते ते पुढे म्हणाले.
या वेळी उद्द्घाटनप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक, डॉ. मकरंद जोशी, संशोधन संचालक, डॉ. प्रशांत शहारे, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अजय राणे, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतुल मोहोड, कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ, स्वामीनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन तसेच राज्य गीत, विद्यापीठ गीत व स्वामीनाथन गीताने करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक निम्नस्तर कृषि शिक्षण विभाग सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष वरवडेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंदार पुरी यांनी केले. यावेळी शाश्वत शेतीच्या अनुषंगाने शाश्वत शेतीमध्ये कृषि अभियांत्रिकीचे योगदान या विषयावर श्री. रिकेश गोसाई पीएचडी स्कॉलर यांनी तसेच शाश्वत शेतीमधील कृषि वनिकीचे महत्व श्री. प्रदयुम्न देशमुख पीएचडी स्कॉलर यांनी तसेच शाश्वत शेती काळाची गरज डॉ. वैभव राजेमहाडीक, शाश्वत काटेकोर शेती डॉ. पूनम चव्हाण आणि शाश्वत शेती फळबाग व्यवस्थापन या विषयावर डॉ. प्रफुल्ल माळी इत्यादींनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध विभागाचे सर्व विभागप्रमुख प्राध्यापक आणि पदव्युत्तर कृषिचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 13/Aug/2025














