सावर्डे : सावर्डे परिसरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या वालावलकर रुग्णालय ते हडकणी या त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तसेच रस्ताही अरूंद आहे. त्याच्या दुतर्फा झाडी वाढली असून, नपानात होण्याची भीती व्यक्त केली.
सावर्डे येथील बाजारपेठ व वालावलकर रुग्णालय आदींमुळे या रस्त्यावर रिक्षा, दुचाकी, एसटी बस, एक आदी वाहनांची मोठी वाहतूक सुरु असते. शिक्षण व रोजगारानिमित्त हडकणीतील बहुसंख्य मुले, स्त्रिया, पुरुष पायी चालत रुग्णालयाकडे येत असतात, त्यांनाही जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. जिल्हा परिषदेने या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता रुंद करण्याची गरज आहे. समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी, वाहनधारकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दुतर्फा रस्त्यावरील झाडीमुळे समोरून येणारी वाहने सहजरीत्या दृष्टीस पडत नाहीत.
त्यामुळे अपघात होण्याची भीती असते. काहीवेळा किरकोळ अपघातही झालेले आहेत. या घटनांमध्ये वाहनांचे नुकसान होत आहे. अनेकवेळा दोन्ही वाहनांना बाजू देण्यावरून वादही झालेले आहेत. मोठी दुर्घटना घडण्याआधी प्रशासनाने या मार्गावरील दुतर्फा वाढलेली झाडे तोडावीत आणि वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी हडकणी ग्रामस्थांनी केली आहे.
बाजारपेठ, रुग्णालयाकडे वर्दळ वाढली
सावर्डे येथील बाजारपेठ आणि वालावलकर रुग्णालय यामुळे या मार्गावर वाहनांची दिवसेंदिवस वर्दळ वाढली आहे. आवश्यक त्या उपाययोजने आभावी या मार्गावर अपघाताचे धोके निर्माण झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:26 PM 18/Oct/2024











