मुंबई : पारसी बांधवांचे नवीन वर्ष पतेतीच्या (नवरोज) निमित्ताने राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
नवरोज हा नुतन वर्षाचा पहिला दिवस उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचे स्मरण देतो.
या मंगल प्रसंगी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू – भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 14-08-2025














