गणेशोत्सवात कोकणासाठी पुणे विभागाकडून जादा एसटी-बसेसचे नियोजन

पुणे : एसटीच्या पुणे विभागाने गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार स्वारगेट, पिंपरी-चिंचवड आगारातून सुटणाऱ्या ८० टक्के गाड्या फुल्ल झाल्या आहेत.

त्यामुळे एसटी गाड्यांची संख्या टप्यटप्याने वाढविणार आहे.येत्या २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यावसायिनिमित्त पुण्यात आलेले कोकणवासी गणेशोत्सवाला कोकणात जातात. त्यांच्यासाठी एसटी आणि रेल्वे जादा गाड्यांचे नियोजन करतेते. त्यानुसार एसटीने दीडशे ते दोनशे अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे.

गणेशोत्सवाच्या तीन दिवस आधी म्हणजे २४ ते २६ ऑगस्ट रोजी स्वारगेट, पिंपरी-चिंचवड आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. महिलांना ५० टक्के सवलतीत तर ७५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी एसटीतून मोफत प्रवास करता येणार आहे.स्वारगेटमधून २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान नियमीत बसशिवाय २७ जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यातील २३ गाड्या फुल्ल झाल्या असून, अन्य चार गाड्याही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक बुक झाल्या आहेत. स्वारगेटमधील २४ तारखेच्या ५ पैकी ३, २५ तारखेच्या १२ पैकी १० गाड्या आणि २६ तारखेच्या १२ पैकी १० गाड्या फुल्ल झाल्या आहेत. तसेच पिंपरी चिंचवड आगारातूनही ३४ पैकी २३ गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार एसटी जादा गाड्या सोडणाकर आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 14-08-2025