सरपंच, ग्रामसेवकांचे ग्राम स्व-निधीबाबत रत्नागिरीत प्रशिक्षण

रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात पुण्याच्या यशदा संस्थेमार्फत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकरिता ग्राम स्व-निधीविषयक प्रशिक्षण झाले. तीन दिवसांच्या या शिबिराची गुरुवारी सांगता झाली.

प्रशिक्षणामध्ये २० सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सहभाग घेतला.

ग्रामपंचायतीने आपले स्वतःचे उत्पन्न आणि उत्पन्नाचे स्रोत कसे विकसित करावे, याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला यशदा येथील सत्र संचालक अमोल बेमिस्टे यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना विस्तृत अशी माहिती दिली. मत्स्य महाविद्यालयाचेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे; मत्स्य संपत्ती, अर्थ, सांख्यिकी व विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नितीन सावंत; मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ आणि मत्स्य महाविद्यालयातील शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सर्वांना विद्यापीठाने प्रकाशित केलेले शाश्वत मासेमारीविषयीचे वार्तापत्र आणि माहिती देणारी पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य महाविद्यालयातील राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या प्रशिक्षणगृहामध्ये करण्यात आले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून श्री. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 18-10-2024