मंडणगड पंचायत समिती येथे रानभाज्या महोत्सव व पाककला स्पर्धा उत्साहात

मंडणगड : “हर घर तिरंगा” मोहिमेचा भाग म्हणून पंचायत समिती, मंडणगड येथे रानभाज्या महोत्सव व पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्रीम. वैदेही रानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

महोत्सवात रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी फायदे तसेच रानभाज्यांपासून बनणाऱ्या पारंपरिक पाककृतींचे प्रदर्शन यावर विशेष भर देण्यात आला. विविध महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रानभाज्यांचे प्रकार, त्यांपासून तयार पाककृती पद्धतींचे प्रदर्शन सादर केले.

आपल्या मनोगतामध्ये श्रीम. वैदेही रानडे मॅडम यांनी ग्रामीण भागातील पारंपरिक अन्नसंपदा जपण्याचे व आरोग्यदायी आहाराचा प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा हा उपक्रम स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारा ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

पाककला स्पर्धेचे निकालः
प्रथम क्रमांकः
प्रीती दीपक जावडेकर, पालवणी
द्वितीय क्रमांकः निर्वि पवन शेडगे, तुळशी
तृतीय क्रमांकः समीक्षा संदेश लोखंडे, कुडुक खुर्द

कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती मंडणगडच्या वतीने करण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, स्थानिक नागरिक व पंचायत समितीच्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे श्रीम. वैदेही रानडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 14/Aug/2025