रत्नागिरी जिल्हा नियोजन निधी वाटप अन्यायकारक : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नियोजनमधून करण्यात आलेले निधी वाटप पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून समान झालेले नाही. आमदारांना २० कोटी तर महायुतीच्या खासदारांना पाच कोटीचे वाटप करण्यात आलेले असून हे अन्यायकारक आहे. यामुळे तीव्र नाराजी असून हा विषय मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घातलेले असून ते त्यांच्या पातळीवर हा विषय सोडवतील, असा विश्वास राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या नामदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या ठिकाणी झालेल्या निधी वाटपामुळे भाजपा कार्यकर्त्यांत नाराजी आहे. समान निधी मिळणे आमचा अधिकार आहे. याबाबत समन्वय समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चव्हाण, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे योग्य निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्गमध्येही शिवसेनेचे दोन आमदार आहेत. त्यामुळे निधी वाटपाबाबत तेथेही मग वेगळा विचार करावा लागेल आणि त्याचे पडसाद सिंधुदुर्गात पहायला मिळतील, असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 15/Aug/2025