रत्नागिरी : जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दरदिवशी विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारा बाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापूर डॉ. एस. डी. रणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, डॉ. व्ही. एस. भोई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई अंतर्गत उपकेंद्र उमरे व महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर हरचिरी-उमरे यांच्या संयुक्त विध्यमाने राष्ट्रीय आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम हा महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर हरचिरी उमरे येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम डॉ. एस. डी. रणवीर, प्रमुख उपस्थितीत झाला.
डॉ. महेंद्र गावडे, रत्नागिरी, डॉ. व्ही. एस. भोई, एन. जी. बेंडकुळे, अविनाश कदम, मुख्याध्यापक, श्रीम. एस. ए. मयेकर, डॉ. शामसुंदर मोरे, डॉ. शीतल सूर्यवंशी, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा आणि शाळेचे सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाबाबत रांगोळी स्पर्धा व पोस्टर पेंटिंग स्पर्धा आयोजित प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये उत्कृष्ट स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. आरोग्य विभाग जिल्हा परिषद मार्फत आयोडिन न्यूनता विकार नियंत्रणाबाबत पुस्तिका वितरित करण्यात आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 19/Oct/2024











