रत्नागिरी : भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले आणि हे वैभवशाली स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिले याचे भान प्रत्येक पिढीला आणि आजच्या शालेय विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे. या निमित्ताने नवनिर्माण हायस्कूलने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १२ ऑगस्टला आंतरशालेय देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. प्राथमिक गट पहिली ते पाचवी आणि माध्यमिक गट सहावी ते ९ वी असे होते. स्पर्धेचे उद्घाटन पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते झाले.
प्राथमिक गटात प्रथम-पारितोषिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय जगद्गुरू नरेंद्राचार्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, तृतीय-नवनिर्माण हायस्कूल आणि उत्तेजनार्थ माने इंटरनॅशनल स्कूलला मिळाले तसेच माध्यमिक गटात माने इंटरनॅशनल स्कूल प्रथम, फाटक हायस्कूल द्वितीय, शिर्के गुरुकुलने तृतीय, तर नवनिर्माणला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 15/Aug/2025









