राजापूर : शासनाच्या ‘हरघर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत राजापूर नगरपालिकेतर्फे आयोजित चित्रकला, पत्रलेखन, प्रश्नमंजुषा, रांगोळी व राखी बनवणे स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमावेळी कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, कर निरीक्षक प्रकाश शिंदे, स्वच्छतादूत शिक्षक सुहास काडगे, आस्थापना लिपिक अनुष्का जुवेकर, प्रथमेश वनगुळे, संदेश जाधव, अजिंक्य कांबळे, विश्वजित जाधव, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेते (प्रथम दोन क्रमांक) शंतनू काळे (गुजराळी शाळा), आराध्य देसाई (विश्वनाथ विद्यालय शाळा). पत्रलेखन स्पर्धा सानवी जाधव (आरएसपीएम), मृणाली बापेडकर (शाळा गुजराळी). चित्रकला स्पर्धा वेद परवडे (विश्वनाथ विद्यालय), स्मित कामतेकर (आरएसपीएम). रांगोळी स्पर्धा : आरएसपीएम, गोखले कन्या शाळा आणि विश्वनाथ विद्यालय (संयुक्त). राखी बनवणे स्पर्धा आरएसपीएम, विश्वनाथ विद्यालय आणि गोखले कन्या शाळा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 15/Aug/2025









