सावर्डे : आपल्याला मोफत ऑक्सिजन पुरवतात; परंतु त्याचे मूल्य आपण जाणत नाही. काही प्राणी आणि पक्षी फळे, फुले व झाडांमुळे आपल्याला साधनसंपत्ती देतात त्यामुळे पर्यावरण साखळी टिकवण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे ही मानवाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन डॉ. राहुल भागवत यांनी केले.
सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित पर्यावरण जागृती कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या संरक्षणाविषयी माहिती दिली. सापांविषयी गैरसमज दूर करताना डॉ. भागवत म्हणाले, सर्व साप विषारी नसतात. साप हे शेकडो उंदीर खातात. त्यामुळे शेतीचे अस्तित्व टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सापांना मारणे हा उपाय नसून, सजगता आणि माहिती यावर भर देणे आवश्यक आहे, असे सांगितले.
याप्रसंगी निसर्गातील बदल, प्राणी व पक्ष्यांचे पर्यावरणातील योगदान यावर आधारित चित्रफिती दाखवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. तानाजी कांबळे, प्रा. माधुरी जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा आवळे यांनी केले, तर स्वागत वाघचौरे यांनी केले. आभार प्रा. अवनी कदम यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 15/Aug/2025














