आरवली-माखजन रस्त्यावर खड्डेच खड्डे

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते माखजन या मुख्य मार्गांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामधून प्रवास करताना ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. आरवली ते माखजन या मार्गावर केले कोंडीवरे-बुरंबाड-सरंद आदी ठिकाणी खड्डे पडल्यामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. कोंडीवरे येथील खड्ड्यांमध्ये माखजन येथील एका दुचाकीला झालेल्या अपघातात स्वाराच्या हाताला दुखापत झाली होती. अवघ्या काही दिवसांवर गणेशाचे आगमन होणार आहे. या मार्गावरून येणारा चाकरमानी खड्यातून येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून या मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. लोक खड्ड्यात पडून जखमी होत आहेत. तरीही बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे- बाबू मोरे, शाखाप्रमुख मावळंगे, ठाकरे शिवसेना

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 15/Aug/2025