चिपळूण : खेरशेतमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन

सावर्डे : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती गाव शाखा खेरशेत यशोधरा महिला मंडळ खेरशेत तसेच सम्यक युवा मंच खेरशेत यांच्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन तक्षशिला बुद्धविहारात उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील कदम होते.

सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सुनिल कदम यांनी तर माता रमाई यांच्या प्रतिमेस महिला संघटनेच्या अध्यक्षा शैला कदम यांनी पुष्पहार अर्पण केला. संघटनेचे उपाध्यक्ष विजय कदम, अनंत कदम, महिला संघटनेच्या सचिव संघमित्रा कदम, लक्ष्मीबाई कदम यांनी तसेच स्थानिक संघटनेचे कोषाध्यक्ष धर्मदास कदम, राजाराम कासारे, सावर्डे विभाग अध्यक्ष काशिराम कदम, राजेंद्र कदम, अॅड. प्रशितोष कदम, विनोद कदम, भीमदास कदम, तेजस कदम, रमेश कदम, राहूल कदम, राजू कदम, नितीन कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कदम यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 19/Oct/2024