देवरुख : संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव यांना कर्नाटक राज्यातील बेळगावी येथील सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटक, गोवा, दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातील काही निवडक व्यक्तींची राष्ट्रीय पुरस्कारासाठी या संस्थेमार्फत निवड करण्यात येते. कोसुंब येथील किरण जाधव यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कामाची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवार २७ रोजी बेळगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. केंद्रीय मंत्री, सिने अभिनेता, मठाधिपती यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. विशेष प्रमाणपत्र, फेटा, चंदनाचा हार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. किरण जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 19/Oct/2024











