महाविकास आघाडीची चिपळुणात बैठक

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या रणनीतीसाठी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच चिपळुणात झाली. यावेळी प्रशांत यादव यांच्यासह माजी आ. रमेश कदम यांनी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून उमेदवार कोणीही असला तरी महाविकास आघाडी म्हणून लढायचे असे आवाहन केल्याची माहिती मिळत आहे. चिपळूण-संगमेश्वरमध्ये संगमेश्वर तालुक्यातून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 19/Oct/2024