रत्नागिरी : मारुती मंदिर मजगाव बसस्टॉप येथे दारुच्या नशेत पडून प्रौढ जखमी

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर सर्कलजवळील मजगाव बसस्टॉप येथे दारुच्या नशेत पडून जखमी झालेल्या प्रौढाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला एका रिक्षा चालकाने माणुसकीच्या नात्याने तेथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.

मंगेश यशवंत भारती (५२, रा. तोणदे, रत्नागिरी) असे या घटनेतील जखमी प्रौढाचे नाव आहे. शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास मजगाव बस स्टॉपजवळ गर्दी दिसल्याने रिक्षा चालक लियाकत युसूफ हपशी (रा. साखरतर, रत्नागिरी) याने त्या ठिकाणी जाउन पाहिले असता त्याला एक प्रौढ दारुच्या नशेत पडल्याने डोक्याला मार लागून जखमी झालेल्या अवस्थेत आढळून आला. बाजूला असलेल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याने त्या जखमी प्रौढाला उचलून आपल्या रिक्षा (एमएच-०८-एक्यू-३४२५) मधून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत तेथील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 19/Oct/2024