रत्नागिरी : चर्चरोड येथे आंब्याची फांदी पडून वीजवाहिन्या तुटल्या

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील बाजारपेठ-चर्चरोड मार्गावर जुनाट आंब्याच्या झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडली. त्यामुळे येथील वाहतूकीसाठी सुमारे ३ तास रस्ता बंद ठेवावा लागला. झाडाची फांदी वीजवाहिन्यांवर पडल्याने त्या तुटून वीजपुरवठा सुद्धा ३ तासापेक्षा अधिकवेळ खंडित झाला होता. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामावेळी लाईनमनना वीज वसुलीसाठी जुंपल्याचे हे परिणाम आहेत.

बाजारपेठेतील मिलाग्रीस चर्चजवळ एका मोठ्या जुनाट आंब्याची झाडाची मोठी फांदी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तुटली. ही फांदी तेथूनच गेलेल्या वीजवाहिनीवर पडल्याने वीजवाहिन्या तुटल्या. परिणामी त्या फिडरच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

दरम्यान, झाडीची मोठी फांदी तासाभरात हटवण्यात आली. परंतू तुटलेल्या वीजवाहिन्या जोडून इतर काम करण्यासाठी त्या मार्गावरील वाहतूक आणि रहदारी बंद ठेवावी लागली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 18/Aug/2025