मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडित हिच्या आई ज्योती चांदेकर यांचं शनिवारी (दि.16) निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलीने म्हणजेच तेजस्विनी पंडित हिने त्यांना मुखाग्नी दिलाय.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
आईचं निधन झाल्यानंतर तेजस्विनी पंडित हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून भावनांना वाट करुन दिली होती.
तेजस्विनी पंडित हिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसेच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचे वयाच्या 69 वर्षी आज 16 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
दरम्यान, ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक जण त्यांना श्रद्धाजंली वाहत आहेत. शिवाय ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झाल्याची भावना कलाकरांनी व्यक्त केली आहे.
ज्योती चांदेकर यांनी वयाच्या 12 व्या वर्षी आपल्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील पाच दशकांत त्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आणि लोकप्रिय देखील झाल्या.
‘ठरलं तर मग’ या मालिकेत त्यांनी साकारलेली पूर्ण आजीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली. त्यांच्या कारकिर्दीत धर्मकन्या, ढोलकी, पाऊलवाट, गुरु यांसारख्या अनेक सिनेमात काम केली..
त्यांच्या अभिनयाची खरी ताकद म्हणजे वास्तवता – ज्यामुळे त्या साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना जवळच्या आणि आपुलकीच्या वाटत. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीने एका खऱ्या ज्येष्ठ कलाकाराला निरोप दिला आहे; परंतु त्यांचं कार्य आणि त्यांची परंपरा पुढील अनेक पिढ्यांना व कलाकारांना तसेच प्रेक्षकांना प्रेरणा देत राहील.
अभिनेत्रीचे ज्योती चांदेकर यांचं निधन होण्यापूर्वी त्यांच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते.
मात्र, दीर्घ आजाराशी झुंज देत असताना ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 18-08-2025














