रत्नागिरी : पावसाळा सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून प्राप्त होत आहेत. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत आता पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी स्वच्छता विभागाने नागरिकांना पाण्याची गुणवत्ता समजण्यासाठी संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. तसेच पाणी गुणवत्ताविषयक रासायनिक व जैविक तपासणीचे अहवाल आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. महिन्यातून एकदा आरोग्य व पाणी स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्त्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 19/Oct/2024









