रत्नागिरी : आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे थांबलेली वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने तातडीने कार्यवाही करत दरड बाजूला केली, ज्यामुळे मिऱ्या नागपूर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी पावसामुळे घाटात दरड कोसळली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. मात्र, पोलीस, महसूल आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे आणि रवी इन्फ्राच्या मशीनने युद्धपातळीवर काम केल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रशासनाने केलेल्या तात्काळ उपाययोजनांमुळे प्रवाशांचा खोळंबा कमी झाला आणि वाहतूक सुरक्षितपणे सुरू झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 18/Aug/2025














