रस्त्यात पडलेली बॅग प्रामाणिकपणे परत करणाऱ्या ओंकार खानविलकरचा लांजा पोलिसांकडून सत्कार

लांजा : रस्त्यावर सापडलेली पैसे व सोन्याचे दागिने असणारी बॅग प्रामाणिकपणे परत करणाऱ्या बेनी बुद्रुक येथील ओंकार अनिल खानविलकर या तरुणाचा लांजा पोलिस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. लांजा तालुक्यातील साटवली येथील बरमारे यांची १३ ऑक्टोबर रोजी प्रवास करत असताना सापुचेतळे येथे रस्त्यावर बॅग पडली होती. बॅगेमध्ये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असल्याबाबत बरमारे यांनी सांगितले होते. या संदर्भात सर्वत्र मेसेज प्रसारित करण्यात आला होता. ही बॅग ओंकार अनिल खानविलकर, (वय ३३, व्यवसाय-टुरिस्ट, रा. खेडशी नाका, रत्नागिरी) मूळ गाव बेनी बुद्रुक यांना बॅग सापडली. बॅगेबाबत सर्वत्र प्रसारित झालेला मेसेज खानविलकर याने वाचला होता. त्या नुसार ही बॅग व त्यातील पैसे सर्व सोन्याच्या वस्तू बॅग मालक बरमारे यांना त्याने परत केली. ओंकार खानविलकर याच्या प्रामाणिकपणाबद्दल लांजा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 19/Oct/2024