नवी दिल्ली : भारतीयांनी दैनंदिन वापरासह दिवाळीतही भारतात तयार केलेल्याच वस्तू खरेदी कराव्यात. व्यापाऱ्यांनीदेखील परकीय माल सोडून स्वदेशी मालाची विक्री करावी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’चे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राजधानी दिल्लीमध्ये देशातील पहिला आठ पदरी द्वारका एक्स्प्रेस वे आणि अर्बन एक्स्टेंशन रोड-२ चे उद्घाटन केले.
आणखी काय बोलले?
- भारत मोबाइल आयात करत होता, पण आता देशात वर्षाला ३० ते ३५ कोटी मोबाइल फोन तयार होत आहेत.
- ‘जीएसटी’ प्रणालीमध्ये नेक्स्ट जनरेशन सुधारणा होणार आहेत. दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे.
- यूपीए’ काळात फक्त फायली हलत होत्या, पण फाइलींवर काम आम्ही केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 18-08-2025














