Kolhapur Rains: गेल्या ३ ते ४ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पाचव्यांदा पात्राबाहेर पडले आहे. सध्या राजाराम बंधारा पाणी पातळी ३१ फुटांवर पोहोचली आहे. तर इशारा पातळी गाठायला केवळ ८ फूट बाकी आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ४६ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत.
पावसाचा जोर वाढल्यास पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय राधानगरी धरणाचे एकूण सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 19-08-2025














