Mumbai Heavy Rain: मुंबईतील एलबीएस मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, कुर्ल्यात 5 फूट पाणी साचले आहे.
रस्त्यावर पाणी साचल्याने एलबीएस मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
एलबीएस रोडवर मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे.
दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. कार पाण्याखाली गेली आहे.
एलबीएस मार्गावर बेस्ट बसचा जवळपास अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे.
मुंबईतील एलबीएस रोडवरील वाहतूक ठप्प
एलबीएस रोडवर पाणी साचले
नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने एलबीएस रोडच्या परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
मिठी नदीने 4.9 मीटरची पातळी गाठली आहे.
मिठी नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होईल. त्यासाठी एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिठी नदीच्याजवळ धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर सुरक्षित स्थळी आवश्यकता वाटली तर नागरिकांना शिफ्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 19-08-2025













