गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये २ लाख ४१ हजार ९७५ मतदार

गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये २ लाख ४१ हजार ९७५ मतदार असून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानानंतर मतपेट्या लवेल येथील जीआयटी महाविद्यालयाच्या वसतीगृहात ठेवण्यात येणार आहेत व त्याच ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेडचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी गुहागर तहसील कार्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यानुसार गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३२२ मतदान केंद्र असून नागरिक केंद्र ६, ग्रामीण केंद्र ३१६, एकूण मतदान केंद्र स्थळ ३००१ नागरिक केंद्र ५, ग्रामीण केंद्र २९६, दि. १६ ऑक्टोबरपर्यंत एकूण मतदार २ लाख ४१ हजार ९७५ असून यामध्ये पुरुष मतदार १ लाख १५ हजार २०८, स्त्री मतदार १ लाख २६ हजार ७६७ आहेत. सर्वात जास्त मतदान असलेले मतदान केंद्र ९२ शृंगारतळी १ हजार ३८२, सर्वात कमी मतदार असलेले मतदान केंद्र २४५ लिंगाडीवाडी गुडे १९२, ज्येष्ठ नागरिक १.३६% एकूण ३२९४, पुरुष मतदार १७७, स्त्री मतदार २२७, दिव्यांग मतदार ०.७५% एकूण १२७५, पुरुष मतदार ८४५, स्त्री मतदार ४२७, युवा मतदार १.५९% एकूण ३८४१, पुरुष मतदार २०४२, स्त्री मतदार १७९९, नियुक्त झोनल अधिकारी संख्या ५३, खेड २२, चिपळूण १५, गुहागर १६. नेमलेली एकूण भरारी पथके एफ एस १२ खेड १, चिपळूण १, गुहागर २, नेमलेली एकूण व्हिडिओ सर्वेक्षण पथके ६ खेड १, चिपळूण १, गुहागर १, नेमलेली एकूण स्थिर सर्वेक्षण पथके ५, खेड १, चिपळूण१, गुहागर ३, निवडणुकीच्या विविध कामासाठी तयार केलेली पथके २१, प्रत्यक्ष मतदान घेणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांची संख्या १,४५० असून मतदानापूर्वी ईव्हीएम ठेवण्यासाठी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लवेल मुलांचे वस्तीगृह (ता. खेड) ही जागा निवडण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 19/Oct/2024