Maharashtra Dam : राज्यातील 11 मोठी धरणे काठोकाठ भरली, जाणून घ्या कुठल्या धरणांत किती पाणी..

Maharashtra Dam : राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर स्थिती पाहायला मिळत आहे. शिवाय धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. आज १९ ऑगस्टपर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे, हे पाहुयात….

आज १९ ऑगस्टपर्यंत राज्यातील आढळा, सीना, पांझरा, उजनी, राधानगरी, तुलसी, विहार, चासकमान, बारावे, भाटघर, पेन ही धरणं १०० टक्के भरली आहेत. तर बहुतांश धरणे ९० टक्क्यांच्यावर भरली आहेत.

आता विभागनिहाय धरणसाठा पाहिला तर नाशिक विभागातील गंगापूर धरण (Gangapur Dam) ८४.७८ टक्के, दारणा धरण ८५.९३ टक्के, करंजवण धरण ९२.३७ टक्के, गिरणा धरण ६९.९३ टक्के, हतनूर धरण ४१.९६ टक्के, ऊकई धरण ७३.३५ टक्के, भंडारदरा धरण ९२.२७ टक्के तर निळवंडे धरण ८५.७७ टक्क्यांवर आहे.

तसेच मुंबई, कोकण विभागातील धरणांपैकी मोडक सागर धरण ९१.७४ टक्के, तानसा धरण ९९.२६ टक्के, म.वैता ९७.५१ टक्के, भातसा धरण ९३.०० टक्के, हेटवणे धरण ९७.३४ टक्के, पानशेत धरण ९६.७६ टक्के, खडकवासला धरण ६६.८४ टक्के, मुळशी धरण ९३.४८ टक्के भरले आहे.

तसेच मराठवाडा आणि नागपूर विभागातील धरणांपैकी जायकवाडी धरण एकूण ९६.१४ टक्के, उजनी धरण एकूण १०२.१८ टक्के, कोयना धरण ९३.६४ टक्के, अलमट्टी धरण ९१.१६ टक्के, मांजरा धरण ९३.२२ टक्के, सिद्धेश्वर धरण ९७.३९ टक्के, गोसेखुर्द धरण ४८.०७ टक्के, तोतला डोह ६८.३४ टक्के, खडकपूर्ण ८७.८७ टक्के, काटेपूर्णा ८५.८६ टक्के, उर्ध्ववर्धा ६६.१६ टक्के भरले आहे.- इंजि. हरिश्चंद्र र. चकोर, जलसंपदा (से.नि) संगमनेर.)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 19-08-2025