दापोली : गेले दोन दिवस कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दापोलीत गेल्या 24 तासात 210 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल दापोली तालुक्यातील जालगांव, मुरुड, केळशी, आंजर्ले, आदी सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. त्याचप्रमाणे घरे, गुरांचे गोठ्यांची पडघड झाली होती. कोकणात पुन्हा एकदा रेड अलर्ट दिल्याने दापोलीत अतिवृष्टी झाल्यास कोणत्याही क्षणी आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू शकते. याच पार्श्वभूमीवर दापोली पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तोरसकर यांनी दिली आहे.
पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ मदतकार्य सुरू करता यावे यासाठी दापोली पोलीस ठाण्याकडे रबरी बोट, लाइफ जॅकेट, रस्सी, कुदळ, फावडे, बॅटरी, स्ट्रेचर आदी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ठेवण्यात आली आहे. पोलीस दल कोणत्याही परिस्थितीत मदतीसाठी तत्पर असल्याचे तोरसकर यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी सतर्क राहून प्रसंगी थेट दापोली पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 20/Aug/2025














