वाढलेल्या भाज्यांच्या दरामुळे गृहिणी त्रस्त

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली असून आता महिनाभर या निवडणुकांची धामधुम सुरू होईल. या धामधुमीतही भाज्या महागलेल्याच आहेत. त्यामुळे एकीकडे नवे शिलेदार निवडण्याची तयारी सुरू असताना जुन्यांच्या नावाने वाढलेल्या भाज्यांच्या दरामुळे गृहीणीनी बोटे मोडायला सुरूवात केली आहे.

यंदाचे सर्व सणवार भाज्यांच्या वाढलेल्या दरातच साजरे झाले. भाज्यांबरोबर सणासाठी लागणारी पुजासाहित्य, फुले, फळेही महागलेली आहेत. टोमॅटोने शंभरी, कांद्याने सत्तरी गाठली, लसूण ३०० ते ३५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बहुतांश भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. यातच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सतत पाऊस सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 19/Oct/2024