रत्नागिरी : भगवती मंदिर परिसराची स्वच्छता

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ला येथील भगवती मंदिरात नवरात्रोत्सव साजरा झाला. या उत्सवात स्वराज्य संस्था ही १० दिवस स्वच्छतेचे मोलाचे कार्य करत होती. गेली २३ वर्षे मंदिर व मंदिराचा परिसर स्वच्छ सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्याचे काम ही संस्था अविरत करत आहे.

स्वराज्य संस्थाच्या अंतर्गत जोडली गेलेली काही मंडळी शिक्षण व नोकरी करत आहेत. या मंडळींकडून सायंकाळी ४ ते १० या वेळेत आपल्या नोकरीवरून आल्यानंतर मंदिराच्या या परिसरातील होणारा खाद्यपदार्थ विक्री, खेळणी व मिठाई विक्री, फुले विक्री यातून प्लास्टिक, फळे, खाद्यपदार्थ यांच्या रोज दोन ने तीन बॅलरएवढा कचरा जमा केला जात होता. त्याचे वर्गीकरण करून तो पिशवीमध्ये जमा केला जातो. नवरात्रोत्सवाच्या समाप्तीनंतर होणारा कचरा जमा केला जातो. सुमारे दोन ते तीन नगरपालिकेच्या कचरा गाड्या भरतील इतका जमा करून पालिकेच्या ताब्यात दिला. या श्रमदानाच्या कार्यात संतोष रेमणे, आदर्श नार्वेकर, ऋषिकेश बने श्लोक चव्हाण, ध्रुव रेवणे, राहुल कडव, विठोबा मांडवकर, अभिषेक खंडागळे, चंद्रकांत मांडवकर, जितेंद्र शिवगण, शुभम प्रसादे, अनिकेत मांडवकर, चव्हाण, आर्च रेवणे, साहिल पेंढारी यांचा सहभाग असतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 19/Oct/2024