अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे अभिवाचन स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धेत सुयश

रत्नागिरी : र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी अभिवाचन स्पर्धेत आणि निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धा मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयाने (शिर्के हायस्कूल, रत्नागिरी ) आयोजित केल्या होत्या.

अभिवाचन स्पर्धेत श्रावणी योगेश खांडेकर (कला शाखा); अथर्व संदेश तेंडुलकर (शास्त्र शाखा); विदुला रामकृष्ण कुलकर्णी (वाणिज्य शाखा) यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकाविला. तर तृतीय क्रमांक ऐश्वर्या सचिन सावंत, पौर्णिमा योगेश ढोकरे व स्वरदा महेश केळकर या कला शाखेच्या विद्यार्थिनींच्या गटाने पटकाविला.

सर्व विद्यार्थ्यांना प्रा. सुप्रिया टोळ्ये यांनी मार्गदर्शन केले. निबंध स्पर्धेत केतकी विवेक पुरोहित या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला. तिने
स्वातंत्र्य मिळाले – सुरक्षिततेचे काय ? या विषयावर निबंधातून विचार मांडले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी कौतुक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 19-10-2024