माखजन : गेला आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीचा फटका संगमेश्वर तालुक्यातील गड नदीलगतच्या लगत असलेल्या भात शेतीला बसला आहे. गेले आठदिवस ही भात शेती पुराच्या पाण्याखाली राहिल्याने पुरती कुजून गेली आहे.
यावर्षी जुन जुलै व ऑगस्ट च्या पहिल्या पंधरावड्यात या शेतीला पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु अनपेक्षित अतिवृष्टी झाल्याने, गडनदी च्या पुरचा फटका नदी पात्रा शेजारील. भातशेतीला बसल्याने येथील शेतकरी हवालदील झाला आहे. येथील हळवी भातशेती पसवण्याच्या जवळ आली होती. परंतु पूराच्या विळख्यात भात पिक सापडल्याने शेतीची नासाडी झाली आहे. यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 21/Aug/2025














