Raigad Boat Accident: रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण करंजा रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे.
दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ, आणि नौदालाच्या गस्त नौकाद्वारे बचावकार्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जिवीत हानी आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काही खुलासा झालेला नाही. वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात कशी आली याची माहिती समोर आलेली नाही. ही बोट गुजरातची आहे.
गुजरातची बोट रायगडमध्ये कशी पोहोचली याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 21-08-2025














